सोयापेंड आयात शेतकऱ्यांच्या मुळावर, सोयाबीन ३७०० रूपये प्रति क्विंटल.
सोयापेंड आयातीचा सोयाबीन मार्केट वर परीणाम होणार का?
भारताने नुकतीच १२ लाख टन सोयापेंड आयातीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.शेतकरी या निर्णयामुळे खुप नाराज झाले आहेत. रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे. सोयापेंड आयात व भारतीय सोयाबीन मार्केट वर काय परिणाम होणार सविस्तर माहिती पाहू.
सोया पेंड आयात का केली ?
भारतातील सोयापेंडीचा तुटवडा निर्माण झाला, त्यामुळे सोयापेंडीचे भाव हे वाडले. त्यामुळे पोल्ट्री व्यवसाय असोसिएशन ने वाणिज्य मंत्रालय यांना सोयापेंड आयातीची विनंती केली. ज्या मुळे सोयापेंडीचे भाव स्थीर राहतील.
GM सोयापेंड आणि वाद
मुळात भारतात GM सोयाबीन वर बंदी आहे. परंतू शासनाने GM सोया पेंड आयात केली आहे . त्यामुळे शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केला आहे. भारतात GM सोयाबीन वर बंदी आहे ह्यात शंका आहे Gm सोयाबीन बंदी असताना GM सोयापेंड आयात केली ती GM सोयापेंड कशी चालते असा प्रश्न शेतकऱ्यांनी केंद्र सरकारला विचारला आहे.
इतिहासातील पहीली GM सोयापेंड आयात
आजपर्यंत भारतात कधीच GM सोया पेंड आयात करण्यात आली नव्हती पण मार्केट मध्ये सोया पेंडीचा तुटवडा निर्माण झाला व भाव ३ पट वाढले त्यामुळे सोयापेंड आयातीचा निर्णय घेतला आहे.
सोयापेंड आयातीचा सोयाबीन मार्केट बाजारभाववर काय परिणाम होणार ?
ज्या वेळी शेतकऱ्यांचे सोयाबीन मार्केट मध्ये येईल त्या वेळी सोयपेंड देखील बाजारात उपलब्ध असणार आहे. त्यामुळे सोयाबीन बाजारभाव मधे निश्चितच थोडाफार प्रमाणात परीणाम राहतील
0 टिप्पण्या
if you hav doubt le know