सोयाबीन ऐतिहासिक भाव वाढ, बारा हजारच्या दिशेने वाटचाल.

      सोयाबीन ऐतिहासिक भाव वाढ, सोयाबीन १२००० रूपयेच्या दिशेने.




    नमस्कार शेतकरी बांधवांनो काल बाजार भाव हाती आले सोयाबीन ची ऐतिहासिक भाव वाढ झाली आहे.बाजार समीतीमधे सोयाबीनला सर्वाधिक किंमत मिळाली.
वाशिम मार्केट मध्ये १०००० रूपये क्विंटल भावाने सोयाबीन विक्री झाले तर लातूरमधे ९८०० रु क्विंटल, हिंगोली मार्केट मध्ये ९८०० इतका बाजार भाव सोयाबीनला मिळाला. 
ही सोयाबीन ईतिहासातील सर्वात मोठा भाववाढ झाली.
चांगली बाब ही आहे की सोयाबीन दर भविष्यात वाढ राहतील. शेतकऱ्यांना या भाववाढीचा नक्की फायदा होईल.

सोयाबीन चे दर का वाढले ?




        बाजारामध्ये सोयाबीन आवक कमी झाली त्या मुळे सोयाबीन बाजार भाव वाढ झाली. जागतिक मार्केट मध्ये सोयाबीनला खुप मागणी वाढली आहे.तेल उत्पादक कंपन्या कडे सोयाबीन उपलब्ध नाही  त्यासाठीच त्या चढ्या दराने सोयाबीन खरेदी करत आहेत. सोयाबीन तेलाच्या गुणवत्ते मुळे तेलाचा खप वाढला आहे. त्यातच पामतेलाचा पुरवठ्यासाठी अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे दर वाढले

सोयाबीन भाववाढ कायम राहील का ?




     खरीप सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना एक चिंता सतावत आहे की हे वाढलेले दर कायम राहतील का तर शेतकऱ्यांना एवढ सांगेन की मार्केट मध्ये दरवाढ ही त्या वेळी उद्भवणारी परीस्थिती नुसार होते.भाववाढ ही कायम राहणार नाहीत त्यामध्ये चढ-उतार नक्की होणार आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन टप्यात टप्यात विकणे फायदेशीर ठरेल
दिवाळी पर्यंत ही भाव वाढ ही सावकाश पणे वाढतील 
भाव स्थिर राहतील .

२०२२ मधे सोयाबीनला भाव मिळेल का? 





    भविष्यामध्ये सोयाबीनला म्हणावे तेवढी भाववाढ होणार नाही त्याच कारण सोयाबीन उत्पादकता सोयाबीन मार्केट मध्ये भरपुर प्रमाणात उपलब्ध असणार . त्यामुळे शेतकऱ्यांना भविष्यात सोयाबीन भाव वाढीसाठी वाट पहावी लागणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या